तोरणमाळ घाटात प्रवासी गाडी दरीत कोसळली ; दोन ठार, ११ गंभीर जखमी

Accident

नंदुरबार (वृत्तसंस्था) तोरणमाळ येथील सात पायरी घाटात नागार्जून मंदिराजवळ प्रवासी गाडी दरीत कोसळून दोन ठार, ११ गंभीर जखमी जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोरक्षनाथ महाराजांचा यात्रोत्सवाससाठी जाणाऱ्या भाविकांच्या बोलेरो गाडीला अपघात झाला आहे. नागार्जून मंदिराजवळ बोलेरो गाडी चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन थेट 30 फूट खोलदरित कोसळले. या अपघातात दोन ठार, ११ गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मयत आणि जखमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Protected Content