कोरोना : आपणच आहोत, आपल्या शहराचे रक्षक: महापौर भारतीताई सोनवणे

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील बहुतांश नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य अद्याप कळलेले नाही. विशेषतः दाट वस्तीच्या परिसरात हे प्रमाण अधिक आहे. कोरोनाला जळगाव शहरातून हद्दपार करण्यासाठी आपणच स्वतःचे आणि परिसरातील नागरिकांचे रक्षक होणे आवश्यक असल्याचे आवाहन महापौर भारतीताई सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात त्या-त्या प्रभागात सर्व जाती, पंथ, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, रिपाई यांच्यासह इतर राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सार्वजनिक गणेश महामंडळ, बजरंग दल, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या परिसरात कोरोना योद्धा म्हणून भुमिका बजावणे गरजेचे आहे. नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करावे यासाठी त्यांनी त्यांच्या परीने आवाहन करावे. आपल्या परिसरातील विशेषतः कॅन्टोनमेंट झोन मधील नागरिकांना घरात थांबायला लावणे, मास्क तयार करणे, आरोग्य सेतू अँप डाउनलोड करायला लावणे यासाठी आपण कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजवावे. आपणच आपल्या शहराचे रक्षक झाले तर जळगाव शहर सुरक्षीत राहील असे मत महापौर भारतीताई सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मांडले आहे.

Protected Content