डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाची अश्विनी गजभिये स्ट्रोक पोस्टर स्पर्धेत द्वितीय

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयातील अश्विनी गजभिये हिने ‘स्ट्रोक -जर्नी टू रिहॅबिलेशन’ या विषयावर पोस्टर तयार करुन ते सादर केले. त्यात ती द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली.

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन कॉलेज ऑफ फिजीयोथेरपीद्वारे या वर्ल्ड स्ट्रोक डेनिमित्त न्यूरोफिजीयोथेरपी विभागातर्फे पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी विभागात चतुर्थ वर्षाला शिक्षण घेत असलेली अश्विनी गजभिये हिने सहभाग घेत दुसरा क्रमांक पटकाविला. मेंदूला जेव्हा रक्तपुरवठा होणे थांबते त्यानंतर कुठले उपचार करता येतात त्याची माहिती पोस्टरात नमुद करण्यात आली.

डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाचे प्रिंसीपल जयवंत नागुलकर यांच्या आदेशानुसार प्रोफेसर डॉ.चित्रा म्रिधा, असीस्टंट प्रोफेसर डॉ.निखील पाटील यांनी मार्गदर्शनाने अश्विनीने पोस्टर तयार केले. तिच्या यशाबद्दल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकरसह टिचींग स्टाफने अभिनंदन केले.

Protected Content