शाळकरी मुलाला पळवून नेण्याचा संशय ; महिला पोलिसांच्या ताब्यात (व्हिडीओ)

dbf61ce9 b68f 4e75 ac20 a09b60c0154c

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मिल्लत प्रायमरी स्कूलच्या बाहेरून आज सकाळी मुलाला पळवून नेत असल्याच्या संशयातून एका महिलेला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेमुळे परिसरात काही वेळ प्रचंड खळबळ उडाली होती.

 

या संदर्भात अधिक असे की,शहरातील मिल्लत प्रायमरी स्कूलच्या बाहेरून आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास एक अज्ञात महिला एका शाळकरी मुलाला हात धरून आपल्या सोबत घेऊन जात होती. यावेळी इथं उपस्थित शेख फिरोज यांनी संबंधित महिलेच्या राहणीमानवरून संशय आला. त्या महिलेला थांबवतील तेवढ्यात राष्ट्रगीत सुरु झाले. राष्ट्रगीत संपताच फिरोज शेख हे त्या महिलेच्या मागे गेले आणि तिला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्या महिलेने पळ काढायला सुरुवात केली. नाजीम शेख नामक व्यक्तीच्या मुलाला पळवून नेण्याचा हा प्रकार घडला. अखेर नागरिकांच्या मदतीने शेख फिरोज यांनी संबंधित महिलेला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा त्या महिलेची चौकशी सुरु होती. संबंधित महिला मनोरुग्ण असल्याचे कळते.

 

Protected Content