जितेंद्र आव्हाड महिनाभरानंतर कोरोनामुक्त ; डॉक्टर,नर्सेससह मानले अनेकांचे आभार

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर माहिती दिली. तसेच त्यांनी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, असे म्हणत आभार व्यक्त केले आहेत.

 

कोरोनावर विजय मिळवल्यानंतर आव्हाड यांनी ट्वीटरवर एक कविता देखील ट्वीट केली. फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरुप घरी जात आहे. यापुढेही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये आव्हाड म्हणाले की, “माझ्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना माझं एक सांगणे आहे की, डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही. त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये, ही माझी एक नम्र विनंती. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल. दरम्यान, आव्हाड यांनी यावेळी त्यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जयंत पाटील, राजेश टोपे, मिलिंद नार्वेकर आणि इतर लोकांचे आभार मानले.

Protected Content