आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज सील

fadnavis

 

 

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला असून मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडून सील करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रासाठी जे मुद्रांक विकत घेतले, ते 3 तारखेला घेण्यात आलं आहे. शपथपत्राची दस्तनोंदणी करणाऱ्या नोटरीचा शिक्काही या शपथपत्रावर आहे. मात्र या शिक्क्यामध्ये असलेल्या नोटरीचा कार्यकाळ 2018 पर्यंतच असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडून सील करण्यात आला आहे. यावर सर्व बाजू तपासून निर्णय घेतला जाईल. असे बोलले जात आहे.

Protected Content