बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; मुद्देमाल हस्तगत

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा व डिकसाई येथे बेकायदेशीर देशी विदेशी दारू बागळणाऱ्या तीन जणांवर पोलीसांनी कारवाई करत १० हजार ५२५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्त केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द आणि डिकसाई येथे काही व्यक्ती बेकायदेशीर देशी, विदेशी व गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोउनि नयन पाटील, पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड, नरेंद्र पाटील, प्रकाश चिंचोरे, दिपक कोळी, अशोक महाले, संजय भालेराव आणि अनिल तायडे यांनी मंगळवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी धडक कारवाई करत आमोदा येथे दिलीप सुकलाल कोळी रा. आमोदा खूर्द ता.जि.जळगाव आणि मंगा झिपरू भिल रा. आमोदा यांच्याकडून दारूच्या बाटल्या व गावठी हातभट्टीची दारू असा ५ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर तालुक्यातील डिकसाई येथे भास्कर चिंतामण पाटील रा. डिकसाई ता.जि.जळगाव येथे कारवाई केली असता ४ हजार ८६५ रूपये किंमतीच्या दारूच्या ५५ बाटल्या हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी तिघांवर रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

 

Protected Content