भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लसीकरण शिबीर

जळगाव, प्रतिनिधी |भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे अयोध्या नगरमध्ये कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अयोध्या नगर येथील मारूती मंदिरात भाजपा युवा मोर्चा जिल्हा महानगरतर्फे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सरचिटणीस अक्षय जेजुरकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप रोटे, मंडळ क्रमांक ३ अध्यक्ष विजय वानखेडे, नगरसेविका रंजना वानखेडे, नगरसेवक विरेन खडके , उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष इंगळे, मंडळ सरचिटणीस किसन मराठे, नाना देशमुख, भा.ज.यु.मो. पदाधिकारी मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, गणेश महाजन, राहुल मिस्तरी विक्की सोनार , सागर जाधव, जयंत चौहान, भुषण जाधव, कोमल तळेले,शिवा कंडारे,सागर चव्हाण, किरण दुसाने ,हर्षल पुरोहित , निखिल सूर्यवंशी , प्रफुल्ल कोळी, व कार्यक्रमाच्या आयोजनात अनमोल सहकार्य भुषण पाटील, चेतन कोळी,भावेश जैन ,शुभम थोरात,संजय पवार , दिपक बाविस्कर,चेतन थोरात, अक्षय बिह्राडे,शुभम वाणी, हितेश खडके, हितेंद्र काळे ,राकेश चौधरी यांनी केले.

Protected Content