Big Breaking : कपाशी व्यापाऱ्याची गाडी आडवून दीड कोटींची रक्कम लुटली !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाराची गाडी आडवून व्यापाऱ्याजवळील दीड कोटींची रक्कम घेवून अज्ञात तीनजण पसार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आह. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंगचे पेमेंट जळगावहून पिंप्रीला जाण्यासाठी कारमधून नेले जात होते. मुसळी फाट्या ते पिंप्री गावादरम्यान असलेल्या निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली व्यापाऱ्याची गाडी येताच बोलेरो कारमधून आलेल्या अज्ञात तिघांनी व्यापाऱ्याची गाडी आडविली. व्यापाऱ्याची गाडी अडवून गाडीतून काही मिनीटात दीड कोटीचे पेमेंट असलेली रक्कमेची लुट करून तिन्ही दरोडेखोर जळगावच्या दिशेने पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बोलेरो कारमधून आलेल्या चोरट्यांनी कार सोडून पसार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content