मुसळधार पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले

जळगाव प्रतिनिधी | काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

शहरासह परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यात खोलगट भागातील वस्त्यांमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर नाले वा मोठ्या गटारींच्या आसपास रहिवास असणार्‍यांच्या घरातही पाणी गेले. या अनुषंगाने शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाला लागून असणार्‍या अपना बेकरी परिसरातील अनेक घरांमध्ये मध्यरात्रीनंतर पाणी शिरले.

यामुळे नागरिकांना घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी परिश्रम करावे लागले. परिसरातून गेलेल्या गटारीची साफसफाई न झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने गटारींची सफाई करावी. तसेच घरात पाणी शिरू नये म्हणून साफसफाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!