Home क्राईम रामेश्वर कॉलनीत हातात तलवार घेवून दहशत करणाऱ्या तरूणाला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

रामेश्वर कॉलनीत हातात तलवार घेवून दहशत करणाऱ्या तरूणाला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

0
105


जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील सिद्धार्थ नगरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील सिद्धार्थनगरात असलेल्या बांधाजवळ एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सचिन पाटील आणि मुकेश पाटील यांनी रविवारी २ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास संशयित आरोपी लखन समाधान सपकाळे (वय-26 रा. बांधाजवळ सिद्धार्थ नगर रामेश्वर कॉलनी) याला अटक केली. त्याच्याकडून  २४ इंची लांबीची तलवार हस्तगत केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात पो.कॉ. मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.


Protected Content

Play sound