शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन

bac216e4 ce1e 4f70 8310 2efecafb7665

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने नुकतेच  नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड यांना निवेदन देण्यात आले.

 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला. परंतु अद्यापही तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. मका पिकावर अळीसाठी लवकरात लवकर पंचनामे करणे. मागील वर्षी महाराष्ट्रातील बहुतेक तालुके दुष्काळी जाहीर झाले. परंतु प्रामुख्याने धरणगाव तालुक्यावर अन्यायच होतोय. प्रमुख विरोधी पक्ष मुग गिळुन गप्प बसले आहेत.

 

मका पिकावर आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. यावर्षी महाराष्ट्रात मका कंपन्यानी मोठ षडयंत्र करून लाखो शेतकऱ्यांना फसवले आहे. आजपर्यंत मका पिकावर कधीही कुठलाच फवारा मारण्याची गरज पडायची नाही. त्यामुळे यात सरकार आणि मका बियाणांच्या कंपन्यांची मिलीभगत आहे असे जाणवते.

 

दरमहा ५०० रु शेतकरी पेंशन योजना अद्यापही बहुतेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. म्हणून विधानसभेच्या आचारसंहिता लागण्याआधी शासनाने लवकरात लवकर दुष्काळी अनुदान व मका पिकावरील आळीच्या प्रादुर्भाचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी.

 

मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड धरणगाव तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या प्रसंगी निवेदन सादर करतांना गोपाल पाटील तालुका अध्यक्ष,त्र्यंबक पाटील शहर अध्यक्ष,श्रीनाथ साळुंके ता.उपाध्यक्ष,राकेश पाटील श.कार्याध्यक्ष,मेघराज पाटील सह सचिव धरणगांव शहर, तुषार पाटील उपाध्यक्ष, विजय राजपूत निंबा पाटील गंगापुरी, खंडु पाटील साकरे,किशोर पाटील, भूषण लोहार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content