… करार अमान्य, ऊसतोड कामगारांनो संप सुरूच ठेवा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

पाटणा वृत्तसंस्था । ऊसतोड कामगारांच्या झालेल्या कराराला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. नातेवाईकांच्या युनियनबरोब झालेला हा करार असून हा करार आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे हा करार मान्य करू नका आणि संप सुरूच ठेवा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पाटणा येथे आले आहेत. त्यांनी एका व्हिडीओ ट्विटद्वारे ऊसतोड कामगारांसाठी झालेला करार अमान्य असल्याचं म्हटलं आहे. पुण्याच्या साखर संकुलात झालेला करार हा नातेवाईकांच्या युनियन्सनी केलेला करार आहे. हा करार ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादम या सर्वांच्या विरोधातील आहे. या करारातून काहीही वाढ मिळालेली नाही. या करारावर सह्याही झालेल्या नाहीत. ऊसतोड कामगारांना नुसतंच वापरून घेतलं जात आहे. त्यामुळे करार मान्य करू नका. कामावर जाऊ नका. हा संप वाढवा, असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांचा प्रश्न आणखी चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Protected Content