सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपच्या आंदोलकांचा बॅरिकेटिंग तोडून प्रवेश

पुणे वृत्तसंस्था । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा गदारोळ झाला असून, अखिल भारतील विद्यार्थी परिषदेने पुंगी बजाव आंदोलन केलं आहे. विद्यापीठातील विविध विभागांतील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षेत 14 हजारांपेक्षा जास्त तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतरही विद्यापीठाचा कारभार संथ गतीनं सुरू आहे. विद्यापीठाच्या या कारभाराविरोधात एबीव्हीपीने आंदोलन केलं असून, बॅरिकेटिंग तोडून आंदोलक आत घुसले आहेत. थोड्याच वेळात कुलगुरू आंदोलकांच्या भेटीला जाणार असल्याचीही चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षेतील घोळ काही कमी होताना दिसत नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत 13 हजारांपेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या अडचणी दूर करण्याचं काम विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान लॉगिन न होणं, प्रश्न न दिसणं, आकृत्या न दिसणं, उत्तरपत्रिका सबमिट न होणं, सर्व्हर जाणं अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता.

Protected Content