शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे भुसावळ, पुणे, मनमाड मार्गे रेल्वेची मागणी

shivsena

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. 28 ऑगस्ट रोजी जळगाव रेल्वे स्थानकात होणा-या समस्यांबाबत आणि भुसावळ-पुणे-मनमाड मार्गे नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे स्टेशन मास्तर अरुण पांडे यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातून पुणे येथे ये-जा करण्यासाठी खाजगी बसेस् हा एकच पर्याय आहे. परंतु खाजगी बसमालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतात. आणि शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस, दिवाळी, दसरा व इतर सणांच्या काळात बस मालकांकडून अक्षरशः लूट केली जाते. काही भागातील गरीब विद्यार्थी, शेतकऱ्यांची मुलं घरी येणे सुद्धा टाळतात. याच भरीस भर जळगाव, औरंगाबाद महामार्गाची असलेली दयनीय अवस्थेमुळे प्रवास जिवघेणा होऊन शरीराची अक्षरशाः चाळणी होते. तसेच जळगाव रेल्वे स्टेशन वरून पुणे येथे जाण्यासाठी ज्या दोन तीन गाड्या आहेत. त्या गाड्यांनाही पुरेसा कोटा नाही. त्यामुळे पुणे येथे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासर्व बाबींचा विचार करत भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे मनमाड मार्गे सुरू होणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रवाशांची सोय होईल व रेल्वेचे उत्पन्न देखील वाढेल. तसेच सुरत रेल्वे गेट जवळ होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटना व त्यामुळे होणारे अपंगत्त्व, मृत्यू यासंदर्भात जीआरपीएफ व आरपीएफ पोलीस यांना जाब विचारण्यात आला. रेल्वेच्या हद्दीत डीआरएम कार्यालयाकडुन संरक्षक भिंत बांधण्यास परवानगी मिळत नाही. याबाबत अनेक वेळालेखी देउन देखील कारवाई केली जात नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास शिवसेना ग्राहक कक्षातर्फे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.  यावेळी राजेंद्र पाटील, हितेश शहा, चेतन प्रभुदेसाई, लोकेश पाटील, विजय राठोड, राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, बाळू बाविस्कर, सुनील ठाकूर, विकास मराठे, जितेंद्र गवळी, गणेश मोझर, संजय सांगळे, किरण भावसार, रोहन पराये, सागर कुटुंबळे, ललित कोतवाल, विनायक पाटील, विजय चौधरी, गणेश सोनवणे, हेमराज चव्हाण, राहुल पाटील व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content