लोकसभा निवडणूकीसोबत ‘या’ राज्यात होणार विधानसभा निवडणुका ; सोबतच १२ राज्यात पोटनिवडणुका

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने आज १६ मार्च शनिवार रोजी लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. या राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपणार आहे.

आंध्र प्रदेशात १३ मे रोजी मतदान होईल, अरुणाचल प्रदेशात १९ एप्रिल रोजी मतदान होईल, सिक्कीममध्ये २० एप्रिल रोजी मतदान होईल, ओडिशात दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५ मे तर दुसऱ्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये सिक्कीम (३२ जागा), ओडिसा (१४७ जागा), अरुणाचल प्रदेश (६० जागा) आणि आंध्र प्रदेश (१७५ जागा) यांचा समावेश आहे. या निवडणुका लोकसभा निवडणुकांच्या सोबतच होणार आहेत. याशिवाय गुजरातमधील ५, यूपीच्या ४, हरियाणा, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या प्रत्येकी १ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच 4 जून रोजी सर्व राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

ओडिशात बिजू जनता दल सत्तेत आहे. तेथे नवीन पटनायक २४ वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. येथे भाजप आणि काँग्रेसशी त्यांची थेट स्पर्धा आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जगन मोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. तेथे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी (टीडीपी), अभिनेता पवन कल्याणची जनसेना पक्ष यांनी एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. हे दोन्ही पक्ष भाजपसोबत मिळून लढणार आहे त्यासोबतच काँग्रेस हा तिसरा पक्ष असेल. अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. सिक्कीममध्ये भाजपच्या समर्थनाने प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वाखाली सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा सरकार आहे. त्यांची सिक्कीम डेमोक्रटिक फ्रंट सोबत लढत आहे.

Protected Content