भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच लक्ष्मी वेंकटेश बालाजी मंदिरात संपन्न झाला. प्रसंगी मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव भारती राठी व जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजश्री कात्यांयनी, वर्षा जैन, ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी मावळत्या अध्यक्ष हेमा बेहरा यांनी नवीन अध्यक्ष बिना अग्रवाल यांना पदभार सोपवला, तर मावळत्या सचिव नीलम जैन यांनी नवीन सचिव वीणा जैन यांना पदभार सोपवला.
मावळत्या कोषाध्यक्ष सोनिया चांडक यांनी निकिता अग्रवाल यांना पदभार सोपवला. कार्याध्यक्ष म्हणून जयश्री भराडिया, उपाध्यक्ष सोनिया चांडक, नीलम जैन, सह कोषाध्यक्ष कामिनी जैन, संघटन मंत्री सोना काबरा, सह संघटन मंत्री रेखा व्यास, प्रचार मंत्री स्नेहा लड्डा, शांता टाक आणि,सरोज भराडिया, रूपा अग्रवाल, रेखा अग्रवाल, नेहा मंत्री, कृष्णा भराडिया, जयश्री अग्रवाल, सुनिता सिंग, सोनिया पांडे, हर्षा जैन, सुनीता जैन, संगीता सुनील अग्रवाल, सुचित्रा अग्रवाल, कविता अग्रवाल, ज्योती अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, शशिकला लाहोटी, आभा दरगड, आरती अग्रवाल,विमल झवर, सोनिया पांडे, रितू अग्रवाल, सुनिता जैन, दीपक अग्रवाल, पुष्पा अग्रवाल, मनीषा काबरा, हर्षा कासलीवाल आदींची उपस्थिती होती. यावेळी अग्रवाल समाज महिला मंडळाच्या सदस्यांनी नुतन अध्यक्षा बिना अग्रवाल यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन भारती राठी यांनी केले तर आभार विना जैन यांनी मानले.
अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न
9 months ago
No Comments