अजंन वृक्षांच्या पालाची बेकायदा वाहतूक पिकअप जप्त; वनविभागाची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-सातपुड्या पर्वतातील पाल वनक्षेत्रातून अंजन वृक्षाचा पाला बेकायदेशीररित्या तोडून चारचाकी पिकअप भरताना एक जण आढळून आल्याने पिकअपसह मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.
आज १६ मार्च शनिवारी सकाळी पाल वन कर्मचारी नियतक्षेत्र पाल मधील वनक्षेत्रात गस्त करीत असताना आरोपी अक्षय नाथु डावर रा.मध्य प्रदेश याला नं ५५ मध्ये अंजन पाला तोडून पिकअप मध्ये भरताना रंगेहात पकडलाअसून पीकअप क्रमांक एम पी. १० जी. ०५७० पिकअप सह अंजनपाला ताब्या घेतला असून आरोपीची चौकशी करण्यात आली.

पिकअप आणि अंजनपाल्यासह एकूण किमंत ३२१२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पाल डी. जी. रायशिंग, वनपाल पाल एम.एम. तडवी, वनरक्षक गारखेडाएस. बी. वाघ यांनी केली

Protected Content