दहिगाव येथे मिरवणुकीत फटाके फोडण्याच्या वादातून मारहाण

Crime 1

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथे शुक्रवारी रात्री एका सामाजिक मिरवणुकीत घरासमोर फटाके फोडल्याच्या कारणावरून वाद होवुन यात झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने तिघे जखमी झाल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे गावात तणावपुर्ण शांतता असुन पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील दहीगाव येथे शुक्रवार ७ फेब्रवारी रोजी एका सामाजिक कार्यक्रमाची मिरवणुक काढण्यात आली होती. सदरची मिरवणुकही गावातील पाटील वाडयातील जय भवानी चौकात सार्वजनिक ठिकाणी परिसरात रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पहोचली असता गावातील अजय बाळु अडकमोल (वय-२६), करण नाना सोनवणे (वय-२०), गौरव दिलीप पाटील (वय-२७) आणि विजय नवल पाटोल (वय-३०) या चौघांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याने या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात दोन तरूण जखमी झाले.

दहीगाव पोलीस स्टेशन कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नेताजी पंडीत वंजारी यांच्या फिर्यादीवरून चार तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांर्थीय लक्षात घेता पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, पोउनि जितेंद्र खैरनार आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात तणावपुर्ण शांतात असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Protected Content