सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल

पटना (वृत्तसंस्था) अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतला फसवून त्याच्याकडून पैसे उकळले आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात पटना येथील राजीवनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची जवळपास ११ तास चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वी रियानेही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्य़ाची विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पटना पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे.

Protected Content