भुसावळातील निस्वार्थ सेवा फाऊंडेशनतर्फे गरीब, गरीबांना अन्नदान वाटप

भुसावळ प्रतिनिधी । येथील निस्वर्थी सेवा फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गरीब व गरजू कुटुंबाना दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. ‍ भुसावळ प्रशासनाकडून विशेष परवानगी घेवून निस्वार्थ मोफत सेवा देण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील गरीब, गरजू आणि हातमजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरीब 400 कुटुंबाना जाम मोहल्ला भागातील अंजुमन रोड भुसावळ जवळील निस्वर्थी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सलीम खान तस्लिम खान,उपाध्यक्ष जुनेद खान, सचिव कदर खान ,कोषाध्यक्ष वसिम खान यांच्या उपस्थितीत सात जणांची प्रशासनाकडून परवानगी घेऊन सकाळी व रात्री असे दोन वेळेचे जेवण भाजी व मांडे तसेच खिचडी भुसावळात सात भागात जेवण तयार करून दिले जात आहे.

Protected Content