‘त्या’ दोन्ही मृत महिलांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचे संशयित म्हणून वैद्यकीय रूग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत पावलेल्या दोन्ही महिलांचे अहवाल निगेटीव्ह आली असल्याची माहिती आज प्रशासनाने जाहीर केली आहे.

याबाबत वृत्त असे की, दिनांक १२ एप्रिल व १३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णापैकी १० व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये रविवारी मृत्यू झालेल्या ८० वर्षीय महिलेच्या व काल मृत्यू झालेल्या ६२ वर्षीय महिलेच्या तपासणी अहवालाचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित संशयित रूग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

कालच मेहरूणमधील पॉझिटीव्ह रूग्णाची १४ दिवसानंतरची चाचणी निगेटीव्ह आली असून यामुळे आरोग्य यंत्रणांच्या अथक परिश्रमाचे चीज झाल्याचे मानले जात आहे. आता प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content