राहूल गांधींवरील कारवाईचा निषेध : एनएसयुआयचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राहूल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ एनएसयुआयच्या वतीने मोर्चा काढून यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे द्वेष भावनेतून लोकसभेतील सदस्यत्व असविधानिक रित्या पाया कायद्याची पायमल्ली करून केंद्र सरकारने आपली मनमानी कारभाराने केले याबाबतचा तीव्र निषेध म्हणून जळगाव जिल्हा एन.एस.यू.आय. तर्फे महात्मा गांधी उद्यान पासून तर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा करण्यात आला.

मोदी सरकार हाय हाय, लोकशाही के सन्मान मे एन.एस.यू.आय. मैदान मे,अशा अनेक केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर जळगाव जिल्हाधिकारी अमान मित्तल यांना जळगाव जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश सरचिटणीस एन.एस.यू.आय. धनंजय चौधरी व त्यांच्या सहकार्‍यांनी निवेदन दिले.

याप्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, प्रदेश सचिव एन एस यू आय चेतन बाविस्कर,जिल्हाध्यक्ष एन.एस.यू.आय. भूपेंद्र जाधव ,आशुतोष पवार यांच्यासह राजू सवर्णे, संजय जमादार,सैयद असल,सूरज पाटील, शेखर तायडे,लियाकत जमादार, छोटू तडवी,अनिफ खान, कल्लू पेलवाण, योगेश चौधरी, अथर्व चौधरी, ईश्वर इंगळे, समीर तडवी,नीरज कोलते,अक्षय पाटील,गौरव महाजन, निलेश बाक्से आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content