घृणास्पद कृत्य करणार्‍या ‘त्या’ नराधमास जन्मठेपेची शिक्षा !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या नराधमाला अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील एका गावात १३ ऑगस्ट २०१९ रोजी भयंकर कृत्य घडले होते. यात देवेंद्र राजेंद्र भोई या नराधमाने अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार केल्याने परिसर हादरला होता. देवेंद्र राजेंद्र मोई (मोरे, वय ३४) याने १३ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ८.३० ते जऊज दरम्यान आरोपी याने नैसर्गिक विधीसाठी जात असलेल्या सात ते नऊ वयोगटातील तीन आदिवासी मुलींचा रस्ता अडविला होता. यात एका मुलीने पळ काढला असला तरी त्याने दोन मुलींना मोटारसायकलवर बसवून अंधारत नेले होते. या दोन्ही मुलींवर त्याने पाशवी अत्याचार केला होता. याप्रसंगी त्याने दोन्ही मुलींना मारहाण देखील केली होती.

दरम्यान, दोन्ही मुलींना एका दाम्पत्याने रक्तबंबाळ अवस्थेत रूग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी देवेंद्र राजेंद्र मोरे याला अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात २१/२०१८ गुन्हा भादंवि कलम ३७६३५४.३३६३, ३६६ १,३२३,५०६, तसेच बालगु संरक्षण कायदा कलम ४.५, आय. एम. आर. तसेच कलम ६.३४ १२ प्रमाणे तसेच अ.जा.ज. अत्याचा प्रतिबंध कायदया प्रमाणे कलम ३ १. ब्ल्यु. १.२. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरूंगातच होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर तपास सह पोलिस अधिक्षक चोपडा, सौरभ अग्रवाल याचे कडे उपास दिल्याने त्यांनी संपूर्ण तपास करून सदरील खटल्यात दोषारोप पत्र अमळनेर न्यायालयात आरोपी विरुध्द दाखल केले. सदरील खटल्यात सरकारी वकील आर. बी. चौधरी यांनी एकुण १९ साक्षीदार तपासले. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश २ अमळनेर पी.आर. चौधरी यांनी सदरील खटल्यातील साक्षीदाराच्या व वैदयकिय अधिकाचा पुरावा ग्राहय धरुन आरोपीताला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणी सरकारी वकील आर. बी. चौधरी यांचा युक्तीवाद प्रभावी ठरला. तसेच यात पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंखे व हिरालाल पाटील तर केस वॉच म्हणून गणेश चौधरी आणि राहूल रणधीर यांनी काम पाहिले.

Protected Content