Home Cities अमळनेर प्रा.जिजाबाई काटे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

प्रा.जिजाबाई काटे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

0
133

WhatsApp Image 2019 02 28 at 4.01.28 PM

अमळनेर (प्रतिनिधी)। रुख्मिणिताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या इतिहास विभागात गेली २० वर्षे प्रा.जिजाबाई ज्ञानदेव काटे यांनी ज्ञानदानाचे कार्य केले आहे. आज त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त एका कार्यक्रमाद्वारे सत्कार करून निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.श्याम पवार हे होते.

यावेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ. हुकूमचंद जाधव, प्रा.डॉ. मंजुश्री खरोले, प्रा. इंद्रायणी मोरे, प्रा.जयश्री साळुंके, प्रा. चारुशीला ठाकरे, प्रा.डॉ. अमोल दंडवते, प्रा.सुनिल वाघमारे , प्रा.डॉ. देवकीनंदन महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती प्रा.सौ. काटे यांनीही यावेळी विद्यार्थीनीना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.क्रांती ठाकरे, कु.कविता सुर्यवंशी, कु.प्रियंका, कु.चेतना यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल वाघमारे यांनी केले तर प्रास्तविक व आभार प्रा.जयश्री साळुंके यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील कर्मचारी विजय इंगळे, बी.एस.पाटील, लक्ष्मण बोरसे, दिलीप गोलाईत, रमेश चव्हाण,  आशाबाई पाटील, सौ. सरिताबाई बोरसे आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound