विंग कमांडर अभिनंदनची उद्या होणार सुटका


pilot

इस्लामाबाद (वृत्तसंस्था)। पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. पाकिस्तानच्या संसदेत त्यांनी ही घोषणा केली. उद्या शुक्रवारी सकाळी भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानची विमाने भारतीय वायूसेनेने पिटाळून लावल्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. भारतीय हवाई हल्ल्याने जो हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्थानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेसाठी पुन्हा आवाहन केले आहे. सोबत पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्द्यावंर चर्चेस तयारी पाकने दर्शविली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here