मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; शिवसेना ठाकरे गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  देशातील मणिपूर राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात दीडशेहून अधिकजण मृत्यूमुखी पडले आहे. दिवसेंदिवस परिस्थीती हाताबाहेर जात असल्याने मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी शुक्रवारी २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले.

 

गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर मध्ये हिंसाचार सुरु आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आहे. शेतात नेऊन या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. मणिपूर  राज्यातील घडलेल्या घटना अतिश लज्जास्पद आणि निंदनिय आहे. भारतीय समाजच्या अशा प्रकारच्या किळसवाणा गुन्हा सहन केला जाऊ शकत नाही. मणिपूर राज्याची परिस्थीती चिंताजनक होत चालली आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन  शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी दिले आहे. याप्रसंगी प्रमोद घुगे, ॲड. विशाल सोनवणे, मंगला सोनवणे, प्रतिभा भालेराव, प्रमोद पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content