जागतिक एड्स दिनानिमित्त पाचोरा येथे जनजागृती रॅली उत्साहात 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | १ डिसेंबर हा जागतिक एड्स नियंत्रण दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने पाचोरा येथे डॉ. वाय.पी. युवा फाउंडेशन, आय.सी. टी. सी. विभाग ग्रामीण रुग्णालय पाचोरा, निर्मलाताई तावरे माध्यमिक विद्यालय पाचोरा, साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय खडकदेवळा बु”, नेहरू युवा मंडळ खडकदेवळा बु” यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व प्रथम मान्यवरांचे स्वागत फॉऊंडेंशन चे डॉ. यशवंत पाटील यांनी केले व तावरे माध्यमिक विद्यालयातून विद्यार्थी / विद्यार्थ्यींनी च्या रॅलीस शाळेच्या सचिव डॉ. अनुजा देशमुख (तावरे) प्राचार्य एस. एफ. पाटील, पी.आर. पाटील, फॉऊंडेंशन चे अध्यक्ष डॉ.‌ यशवंत पाटील, ग्रामीण रुग्णालयाच्या कॉउन्सिंलर लता चव्हाण यांनी रॅलीस हिरवी झेंडीं दाखवून उद्घाटन केले.

रॅली शाळेतून देशमुखवाडी मार्गाने सरदार वल्लभभाई पटेल रोड, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ग्रामीण रुग्णालयाच्या आवारा पर्यंत आली. रॅली मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृती विषयीच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अमित साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना एड्स जनजागृती विषयी थोडक्यात मार्गदर्शन केले. व रॅलीस परत शाळेत रवाना करण्यासाठी डॉ. अमित साळुंखे, डॉ. शुभंम तेली, डॉ. अनुजा देशमुख, फॉऊंडेंशनचे अध्यक्ष डॉ‌. यशवंत पाटील, पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, लॅब टेक्निशियन श्रीकांत भोई, लता चव्हाण, वाचनालयाचे संचालक संजय निकम, विश्वास पाटील, देवचंद गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडीं दाखवून रवाना करण्यात आले.

यावेळी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. त्यानंतर विद्यालयात एड्स विषयावर डॉ. यशवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तावरे माध्यमिक विद्यालय पाचोरा, ग्रामीण रुग्णालय पाचोरा, डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन, नेहरू युवा मंडळ, आणि साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय खडकदेवळा बु” येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content