जळगाव भाजपा कार्यालयात आमदार भोळे यांच्याहस्ते शिक्षकांचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी । शिक्षक दिनाचे औचित्य साधून पूर्व संध्येला प्रातिनिधिक स्वरुपात भाजपा शिक्षक आघाडीच्या शिक्षकांचा जिल्हाअध्यक्ष भाजपा ग्रामीण तथा आमदार भोळे यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार भोळे म्हणाले की, आज समाजातील प्रत्येक शिक्षित, आदर्श माणसाची जडणघडण हि शिक्षकांमुळेच आहे. शिक्षक हे गुरुजन आहेत तेच नैतिक मूल्याचे धडे देतात हा माझा विश्वास आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ते शिक्षण देत आहेत. काही अडचणी आहेत. जश्या ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांना मोबाईल, वायफाय, डाटा पुरवणे या मागणी साठी मी मा.जिल्हाधिकारी यांच्याशी नुकतेच बोललो आहे . ह्या वेळी भाजपां शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी जिल्हा बँके विषयी काही तक्रारी मांडल्या. शिक्षकांचे पगार पुस्तक भरले जात नाहीत ते ई मेल ने सुद्धा खातेदारांना बँक स्टेटमेंट पाठवू शकतात, ए.टी.एम. चे चार्जेस जास्त आहेत. कोविड काळात पर्सनल लोनचे हफ्तेफेड साठी मुदत वाढ द्यावी, पगार जमा झाल्यावर विलंब करू नये. एस.एम.एस सुविधा अपडेट करावी. शिवाय राष्ट्रीयकृत बँके प्रमाणे खातेदारांना विमा संरक्षण मिळावे.

या तक्रारीचे निवारण म्हणून आमदारांनी त्याच ठिकाणाहून जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालकांना भ्रमंण ध्वनी हून संपर्क केला. व बँकेच्या एम.डी. साहेबांनीही त्वरित प्रतीसाद देत मीच तुमच्यापर्यंत येतो म्हणून सभास्थानी हजर झाले. व सर्व प्रश्न निकाली लावतो म्हणून आश्वस्थ केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष मा. दीपक भाऊ सूर्यवंशी संभोधनात म्हणाले, देशाच्या विकासात समस्त शिक्षक वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. हे कोणीच नाकारू शकत नाही. या आधुनिक काळातही शिक्षकांचे महत्व तेच आहे.

याप्रसंगी यांची होती उपस्थिती
संदीप घुगे, दुष्यंत पाटील, ए.बी.पाटील, प्रवीण धनगर, विजय गिरनारे, के.एस.पाटील, किरण पाटील, पी.एल.हिरे, सतीश भावसार, विशाल कुमार पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार भार संजय वानखेडे यांनी मानले.

Protected Content