अवघ्या तीस मिनीटात एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील केळकर मार्केट येथील दत्त मंदिराजवळून एकाची दुचाकी चोरून दिल्याची घटना शनिवारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल मुरलीधर भट (वय-४५) रा.राधाकृष्ण नगर, एस. के. ऑइल मिल जवळ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता अतुल भट हे त्यांची दुचाकी (एमएच १९ एए ९१६९) ने जळगाव शहरातील केळकर मार्केट येथे आले होते. या ठिकाणी दत्त मंदिराजवळ त्यांनी दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेले. दरम्यान दुपारी १ वाजता काम आटोपून ते परत आल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.

Protected Content