वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या बाजूला असलेल्या जैन गेट जवळून विनापरवाना ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडले. ही कारवाई शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, मेहरूण  तलावाच्या बाजूला असलेल्या जैन यांच्या गेटजवळून ट्रॅक्टर मधून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती तलाठी राहुल सुभाष कुमावत यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी पथकासह  शनिवारी ४ दुपारी १ वाजता कारवाई केली. दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ – १९०९)  या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करत असल्याचे समोर आले. वाळूने भरलेले ट्रॅक्टर महसूल पथकाने जप्त केले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक योगेश रामचंद्र कोळी रा. रामेश्वर कॉलेज, अनिल बुधा सोनवणे रा. नागझिरा ता.जळगाव, प्रेम महारु जाधव रा. रामेश्वर कॉलनी आणि रविंद्र सोमा चौधी रा. आदर्श नगर, जळगाव या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Protected Content