डॉ. दयाल तोष्णीवाल एआयएमए स्टार ॲक्युपंक्चर अवॉर्डने सन्मानित

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | डॉ. दयाल तोष्णीवाल यांना नुकतेच छत्रपती संभाजी नगर येथे एआयएमए स्टार ॲक्युपंक्चर अवॉर्डनी सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

 

रविवार दि. २७ नोव्हेंबर  रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयुष  इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरचा ॲक्युपंक्चर स्टार अवॉर्ड २०२२ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. दयाल तोष्णीवाल यांना एआयएमए स्टार ॲक्युपंक्चर अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. या अवॉर्ड वितरण समारोहात  भारतातून अनेक राज्यातुन ॲक्युपंक्चरिस्ट सहभागी झाले  होते.  नुसतीच महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलची स्थापना होऊन हजारो लोकांना रजिस्ट्रेशन देण्यात आले. अश्या ॲक्युपंक्चर प्रचारक काही महाराष्ट्रमधील लोकांना व महाराष्ट्र बाहेर जे ॲक्युपंक्चरचा प्रचार प्रसार करतात अश्या लोकांना हा अवॉर्ड देण्यात आला. या अवॉर्डला देशातील सर्वात भव्य ॲक्युपंक्चर अवॉर्ड मानल्या जात आहे. या कार्यक्रमला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री  डॉ. भागवत कराड, डॉ. रजनीश कांत यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती.या अवॉर्ड बद्दल सर्व ठिकाणावरून मित्र परिवार कडून शुभेच्छाची वर्षाव होत आहे.

 

Protected Content