मंगळवारी चाळीसगाव धुळे पॅसेंजर रद्द

Train

भुसावळ, प्रतिनिधी | मंगळवार २४ डिसेंबर रोजी धुळे-चाळीसगाव पॅसेंजर ही इंजिनिअरिंग विभागा मार्फत काम करण्यात येणार असल्याने रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे भुसावळ विभागमध्ये जामदा-शिरूड दरम्यान इंजिनिअरिंग विभागा मार्फत काम करण्यात येणार असल्याने धुळे-चाळीसगाव पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५१११४ डाऊन धुळे – चाळीसगाव पॅसेंजर ही दिनांक २४ डिसेंबरला आणि गाडी क्रमांक ५१११५ अप चाळीसगाव -धुळे पॅसेंजर ही गाडी रद्द करण्यात आली आहे.  तरी यांची नोंद घ्यावी असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Protected Content