Home क्राईम सर्पदंश झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

सर्पदंश झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
115

15728657705dc006ea667030.16057812

जळगाव प्रतिनिधी | शेतात काम करत असतांना सापाने चावा घेतलेल्या मुलाचा आज जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे २  वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, आकाश बुधा बारेला (वय १४, रा. नरवडे ता.चोपडा) हा १८ डिसेंबर रोजी आपल्या आईसोबत नरवाडे शिवारातील शेतात काम करत असतांना दुपारी ३ वाजता त्याच्या पायाला सापाने चावा घेतला होता. त्याला नातेवाईकांनी तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. दरम्यान, आज पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ असा परिवार आहे.


Protected Content

Play sound