राज्यपालांचं वर्तन गीनिज बुकमध्ये नोंद करण्यासारखे : वडेट्टीवार

 

नांदेड : वृत्तसंस्था ।मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी असल्याचे प्रतिपादन करून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याच्या मागणीसंदर्भात एक पत्र लिहिलं. त्यात कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना रामभक्तीची आठवण करून दिली होती. ममुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा केली होती,फ असं कोश्यारींनी पत्रात म्हटलं. तुम्ही स्वत:ला रामभक्त, हिंदुत्ववादी म्हणवता. मग आता तुम्हाला मंदिरं खुली करण्यासाठी काही दैवी संकेत मिळत आहेत का, असा खोचक प्रश्‍न राज्यपालांनी उपस्थित केला.

राज्यपालांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यात आज मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, विद्यमान राज्यपालांइतकी वादग्रस्त भूमिका आतापर्यंत कोणत्याच राज्यपालांनी घेतलेली नाही. त्यांनी ज्या रंगाचा, ज्या भावनेचा, ज्या विचारांचा चष्मा घातला आहे, तो त्यांनी काढावा, अशी महाराष्ट्राची भूमिका आहे. राज्यपालांचे आक्षेपार्ह वर्तन हे गिनीज बुकमध्ये नोंदण्यासारखे असल्याच टोला देखील वडेट्टीवार यांनी मारला आहे.

Protected Content