पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीचे आरक्षण सोडत जाहीर

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत ची निवडणूकचे बिगुल वाजले असून बुधवारी ग्रुप ग्रामपंचायत हॉलमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान ही आरक्षण सोडत रोटेशन पद्धत न झाल्याने माजी उपसरपंच रवींद्र मोरे यांनी हरकत घेऊन आपल्याला न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.

मंडल अधिकारी मृणाल उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत हॉलमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या ग्रामसभेत गावातील सर्व वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून आरक्षण पुढील प्रमाणे वार्ड क्रमांक एक (१) स्त्री साठी (२) सर्वसाधारण ( ३) सर्वसाधारण स्त्री वार्ड क्रमांक दोन ( १) अनु सुची जाती स्त्री साठी (२) सर्वसाधारण ( ३) सर्वसाधारण स्त्री वार्ड क्रमांक तीन (१) मागास प्रवर्ग साठी ( २) सर्वसाधारण साठी क्रमांक चार ( १) मागास प्रवर्ग साठी (२) सर्वसाधारण (३) सर्वसाधारण स्त्री साठी
वार्ड क्रमांक पाच (१) अनुसूचित जाती जमातीसाठी (२) सर्वसाधारण ( ३) सर्वसाधारण स्त्री वार्ड क्रमांक सहा ( १) अनुसूचित जमाती(२) मागास प्रवर्ग ( ३) सर्वसाधारण स्त्री तर सरपंच पदासाठी लोकनियुक्त पदासाठी अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

या ग्रामसभेत माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, शिवसेना शहरप्रमुख संजय तायडे, शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे, माजी जि प सदस्य राजधर पांढरे, माजी उपसरपंच श्याम सावळे, माजी उपसरपंच रवींद्र मोरे ,इरफान शेख, ईश्वर बारी, माजी उपसरपंच ईका पैलवान, रामेश्वर पाटील, प्रशासक जी व्ही पाटील, ग्रामसेवक टी पी टेमकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content