रालोआच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड

modiinterview19042019 0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय लोकशाही आघीडीच्या (एन.डी.ए.) नेतेपदी आज (दि.२५) सायंकाळी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. एनडीएतील ज्येष्ठ नेते, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जदयु नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान व एनडीएच्या अन्य नेत्यांनी अनुमोदन दिलं.

 

त्यानंतर सर्व नवनिर्वाचित खासदारांनी हात उंचावून मोदी यांच्या निवडीचे हात उंचावून समर्थन केले. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा उत्सुर्त घोषणा संपूर्ण सभागृहाने दिल्या. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित एनडीएच्या बैठकीत मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मोदींची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. एनडीएच्या ३५३ नवनिर्वाचित खासदारांनी मोदींची नेतेपदी निवड केल्याचे शहा म्हणाले.

दरम्यान, त्याआधी भाजपच्या संसदीय पक्षनेतेपदीही नरेंद्र मोदी यांची एकमताने औपचारिकपणे निवड करण्यात आली. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यास माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले.

Add Comment

Protected Content