पंकजा मुंडे यांना धक्का ; ‘ वैद्यानाथ’चं बँक खातं सील

 

 औरंगाबाद  : वृत्तसंस्था । भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. वैद्यानाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे. पंगेश्वर साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी तीन कोटींचा दंड ठोठावला आहे.

 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कामगारांची भविष्य निधीची रक्कम जमा न केल्याने, या कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे.  पंनगेश्वर साखर कारखान्याने विनापरवाना ऊस गाळप केल्याने त्याला दंड आकारण्यात आला आहे.

 

पंकजा मुंडे यांच्या खासगी मालकीचा कारखाना हा लातूर जिल्ह्यातील पानगावमध्ये आहे. पनगेश्वर साखर कारखाना असं त्याचं नाव आहे, त्या कारखान्यावर विना परवाना गाळप हंगाम केल्याचा आरोप होता, मनसेच्या एका नेत्याने तशी तक्रार केली होती. त्यानुसार त्यावर तीन कोटींचा दंड ठोठावला गेला आहे.

 

औरंगाबादचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने वैद्यनाथ कारखान्याचं बँक खातं सील केलं आहे. एवढच नाहीतर त्यातून ९२ लाख रुपये जप्त देखील करण्यात आलेले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने पीएफची रक्कम थकवली होती, त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही रक्कम न भरण्यात आल्याने कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे व त्यातून रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

 

Protected Content