ठाकरे गटाला कल्याणमध्ये मोठा धक्का; जिल्हाप्रमुख शिंदे गटात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना ठाकरे गटातून अनेक नेत्याची आउटींग सूरूच आहे. ठाकरे गटाचे नेते शिंदे गटात प्रवेश करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत कल्याणमध्ये गेले. परंतु उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा झाला नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कल्याण येथील पदाधिकाऱ्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांनी शनिवारी १६ मार्च रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. कल्याण लोकसभा मतदार संघावर शिंदे गटाचे वर्चस्व होते. परंतु आता उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोराडे शिंदे गटात आले. यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिकच भक्कम झाली आहे. यावेळी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच कल्याण डोंबिवली उल्हासनगरमधील पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content