Home आरोग्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

0
26

मुंबई । राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावरील एक कर्मचारी कोरोना बाधीत झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेतली. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडच्या काळात नितीन राऊत, हसन मुश्रीफ आदींसारख्या मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात आता वर्षा गायकवाड यांची भर पडली आहे.


Protected Content

Play sound