मराठा आरक्षण आंदोलन : गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय

 

मुंबई प्रतिनिधी । मराठा आरक्षण आंदोलनातले गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन केलं होतं. मूक मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात आले होते. या दरम्यान काही खटले दाखल करण्यात आले होते. यातले २६ खटले हे गंभीर स्वरुपाचे असून ते न्यायप्रविष्ट आहेत. गंभीर स्वरुपाचे खटले नसलेले सर्व खटले रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Protected Content