ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खाते

मुंबई प्रतिनिधी । ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खाते सोपविण्यात आले असून ते जळगावचे पालकमंत्रीदेखील असतील हे स्पष्ट आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी गत सोमवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर त्यांना नेमके कोणते मंत्रीपद मिळणार याबाबत उत्सुकता लागली होती. या पार्श्‍वभूमिवर, राज्य मंत्रीमंडळाच्या खाते वाटपात त्यांच्याकडे पाणी पुरवठा खाते सोपविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्याकडे जळगावचे पालकमंत्री म्हणूनदेखील जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहितीदेखील समोर आली असली तरी याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

Protected Content