सीबीएसई दहावी , बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई ) १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

४ मे ते १० जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालं आहे

१० वी आणि १२ वीच्या मुख्य परीक्षांमध्ये निश्चित वेळेचं अंतर असेल. त्यामुळे त्यांना तयारीसाठी वेळ मिळेल. १२ वीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल, वेळ वाचवण्यासाठी असं केलं जात आहे. दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षा ही परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. दुसऱ्या शिफ्टमध्ये चार दिवस परीक्षा होईल. या दिवसांमध्ये १० ची मॉर्निंग शिफ्टमध्ये मुख्य विषयांची परीक्षा असेल. दुपारची परीक्षा निवडक सेंटरवर होईल.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात सीबीएसईच्या परीक्षांचाही समावेश होता. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झालीय. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व शाळांमध्ये १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै २०२१ पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

Protected Content