केसीई सोसायटी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

mj college

जळगाव प्रतिनिधी । येथील खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटीचे मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय आणि मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ.शंकर मोडक पुरस्कृत “एकात्मिक अर्थशास्त्र व त्याची सद्यस्थितीतील यथार्थता” या विषयावर १० सोमवार रोजी सकाळी ९.३० वाजता व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून डॉ.विवेक काटदरे (माजी संचालक,आय.एम.आर.कॉलेज,जळगाव) यांनी आपल्या व्याख्यानात अध्यात्मिक आर्थिक गाभा या प्रतिमानावर भर दिला. या प्रतीमानाचा मुख्यगाभा हा अध्यात्म आहे.परंतु हे अध्यात्म म्हणजे पारंपारिक नसून सकारात्मक विचार हेच अध्यात्म आहे. एकात्मिक अर्थशास्त्रामुळे मानवी समस्यांचे कायमस्वरूपी उत्तर देता येईल.

एकात्मिक अर्थशास्त्रात १.पैसा संपत्ती, २. आरोग्य संपत्ती, ३. ज्ञान, कौशल्य, धाडस संपत्ती ४.कुटुंब संपत्ती, ५.कारकीर्द संपत्ती, ६.औदार्य संपत्ती, ७.अध्यात्म संपत्ती, ८.प्रभाव संपत्ती अशा आठ प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो असे मत त्यांनी मांडले. पारंपारिक अर्थशास्त्रात फक्त पैसा संपत्तीचाच विचार केला जातो. इतर अन्य सात संपत्तीचा विचार केला जात नाही. केवळ पैसा/आर्थिक संपत्तीस अतिमहत्व दिल्यामुळे पारंपारिक अर्थशास्त्र मानवी समस्यांचे कायमस्वरूपी उत्तर देऊ शकत नाही. कुटुंब ही देखील एक संपत्ती असून आत्महत्या सारख्या घटना घडणार नाहीत असे परखड मत त्यांनी मांडले . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. रा.य.माहोरे यांनी आपल्या भाषणात बोलताना मराठी अर्थशास्त्र परिषदेविषयी व त्यांच्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. एस. बोरसे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती पाटील यांनी तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. जी. पी. पवार यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ . डी. एस. इंगळे, डॉ. श्रीराम जोशी तसेच अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वक्त्यांना अनेक प्रश्न विचारले व वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक प्रा. डी,आर. वसावे, डॉ. एन. जी. सुर्यवंशी, प्रा. अमोल बावस्कर , प्रा. एन.एन.चौधरी यांनी सहकार्य केले.

Protected Content