ब्रेकींग : वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनपोत धुमस्टाईल लांबविली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गायत्री नगरात पायी जात असलेल्या ६० वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोनपोत दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी ओढून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवार २२ मर्च रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार २३ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुलोचना वसंत खैरनार वय ६० या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सुलोचना खैरनार ह्या शुक्रवार २२ मार्च रोजी मेडिकलवर औषधी घेण्यासाठी गेल्या होत्या. शिरसोली रस्त्यावरील एका मेडिकलवरून औषधी घेऊन त्या घराकडे पायीच जात होत्या. मुख्य रस्त्यावरून त्या गायत्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असतांना दुचाकी आलेल्या अज्ञात दोन जण त्यांच्या पाठीमागून येवून त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनपोत ओढून पसार झाले.

ही घटना घडल्यानंतर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावती यांच्यासह एमआयडीसी पोलीस कर्मचारी यांनी घटनस्थळी धाव घेतली. या प्रकरणी सुलोचना खैरनार यांनी शनिवारी २३ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे करीत आहेत.

Protected Content