पोलीस ठाण्यासमोरच महिलेने स्वत:ला पेटवले

Rape Burnt Case

  

नाशिक (वृत्तसंस्था) आपली विवाहित मुलगी सासरी नांदायला जात नसल्याच्या वादातून येथील पंचवटी पोलीस ठाण्यासमोर एका ५५ वर्षीय महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनप्रीत संधू (वय २७) हिचे गेल्याच महिन्यात छत्तीसगडमधील रायपूर येथील राजिंदर पाड्डा याच्याशी लग्न झाले होते. मात्र, इच्छेविरुद्ध लग्न लावून देण्यात आल्याने ती नाखूश होती. लग्नानंतर आठवडाभरातच अमनप्रीत माहेरी परतली. परंतू आई हरप्रीत आणि वडिलांनी मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि तिला सासरी जाण्यास सांगितले. तेव्हा अमनप्रीतने सासरी न जाता थेट मैत्रिणीचे घर गाठले. घरच्यांनी सारखा तगादा लावल्यामुळे अमनप्रीतने पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमनप्रीतच्या पालकांना बोलावून मुलगी सज्ञान असून तिच्या इच्छेविरोधात काहीही करता येणार नाही, असे बजावले. हा वाद तिच्या आईला असह्य झाला. यातून आईने पोलीस ठाण्यासमोरच स्वतःला पेटवून घेतले.

Protected Content