जळगावातून एकाची दुचाकी लांबविली; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जुने धुळे रोडवरील कांताई नेत्रालय परिसरातून तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी उघडकीला आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अरविंद बाबुराव बागुल (वय-६८) रा. हर्षवर्धन कॉलनी कांताई नेत्रालय परिसर, जुने धुळे रोड हे खासगी नोकरीला आहे. त्यांच्याकडे घरघुती कामासाठी आणि कामावर जाण्यासाठी (एमएच १९ एयू २७१७) क्रमांकाची दुचाकी आहे. त्यांच्या घरासमोर गटारीचे कामे सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या गल्लीतील रहिवाश्यांनी एका झाडाखाली सर्व गाड्या रात्रीवेळी लावतात. अश्याच पध्दतीने त्यांनी देखील ११ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता दुचाकी पार्किंगला लावली होती. दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता दुचाकी जागेवर नव्हती. दुचाकीचा शोधाशोध केली असता मिळून न  आल्याने तालुका पोलीसात तक्रार दाखल केली. अरविंद बागुल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजय भालेराव करीत आहे. 

Protected Content