बोगस डॉक्टरमुळे आदिवासी महिलेचा मृत्यू : मुन्नाभाई गावातून फरार !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली गावातल्या बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडालेली असतांनाच हा मुन्नाभाई गावातून गाशा गुंडाळून पळून गेल्याचे वृत्त आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली गावात अनेक दिवसापासुन आपली दुकानचालवणार्‍या एका बोगस डॉक्टराकडुन चुकीच्या उपचारा पध्दतीमुळे एक महिलेचा दुदैवी मृत्यु झाल्याची खळबळजनक घटनासमोर आली आहे. या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , कोरपावली तालुका यावल या गावात गेल्या तिन ते चार वर्षापासुन विद्युत राय या बंगाली कथित डॉक्टरांने आपला दवाखाना उघडला होता.

या बोगस डॉक्टराच्या विरुद्ध यावल तालुका डॉक्टर असोसिएशन पासुन तर गावातील सरपंच यांनी वारंवार या बोगस डॉक्टराचा दवाखाना तालुका आरोग्य यंत्रणेने बंद करावा अशी लिखित तक्रार केली होती. तथापि, आरोग्य विभागाने या संदर्भात थातुरमातुर चौकशीच्या पलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे या बोगस डॉक्टराचा दवाखाना राजरोसपणे सुरूच होता. याच बोगस डॉक्टरमुळे एका महिलेस प्राण गमवावा लागला आहे.

या बोगस डॉक्टराकडे उपचार घेणार्‍या एका ४० वर्षीय आदिवासी महिलेचा चुकीच्या उपचारामुळे दुदैवी मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या बोगस डॉक्टराकडे सदरच्या महिलेचा उपचार सुरु होता. पण उपचार सुरू असतांना बोगस डॉक्टराकड्रन चुकीच्या पद्धतीने महिलेस इंजेक्शन दिले गेल्याने तिचा पायावर विपरीत परिणाम झाले. तिला याचा खूप त्रास होऊ लागला.

दरम्या, हा प्रकार या तोतयाच्या लक्षात आल्याने संबंधीत मुन्नाभाई डॉक्टराने काही दिवसापुर्वीच पळ काढला होता. तर, या आदिवासी महिलेचा आज मृत्यू झाला. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजु तडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण या संदर्भात त्वरित संपुर्ण सखोल चौकशीचे आदेश देवुन या आदीवासी महिलेच्या मरणास जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करू असे सांगीतले आहे.

तर, तालुक्यात अनेक गावांमध्ये बोगस बंगाली डॉक्टर्स रूग्णांच्या जीवाशी खेळ करत असतांना त्यांच्यावर कारवाईची टाळाटाळ का करण्यात येत आहे ? अशी विचारणा आता करण्यात येत आहे. या आदिवासी महिलेच्या मृत्यूची चौकशी करून तिला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे.

Protected Content