मनवेल येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेवून आत्महत्या

yawal shetkari

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील 77 वर्षीय शेतकऱ्याने कर्जफेड होत नसल्याच्या ना उमेदीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांची डॉ.शुभम जगताप यांनी विचारधन केले आहे.

तालुक्यातील मनवेल येथील सुरेश भागवत पाटील (वय-77) यांचेकडे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे दोन लाख 90 हजार रुपये कर्ज होते. गेल्या दोन-तीन वर्षापासूनची नापिकी, व्यापाऱ्‍याकडून बाजारभावा प्रमाणे केळीस मिळत नसलेला भाव आणि मार्च अखेर कर्जावरील बॅकेचा भरावा लागणारा हप्ता या चिंतेमुळे सुरेश भागवत पाटील यांनी आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास सुरेश पाटील नेहमीप्रमाणे पिळोदा शिवारातील त्यांच्या मालकीच्या गट नंबर 44 /1 या शेतात गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही. म्हणून रविवारी सकाळी कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहिले असता ते मृतावस्थेत आढळून आले. शेतात त्यांचे मृतदेहाशेजारी विषाच्या बाटल्या आढळून आले. त्यांचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला त्यांचा मृतदेह येथील रुग्णालयात आणल्यानंतर त्यांचेवर डॉक्टर शुभम जगताप यांनी शवविच्छेदन केले आहे. रुग्णालयात मनवेलचे माजी पंचायत समिती सदस्य अरूण पाटील, अनिल श्रावण पाटील, पं.स. सदस्य दीपक पाटील, वडोदा येथील सामाजीक कार्यकर्ते संदीप सोनवणे व नातेवाईक उपस्थित होते. पुतण्या नंदकिशोर पाटील यांनी दिल्या यांनी दिलेल्या खबरीवरून येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे का युनुस तडवी करीत आहेत.

Add Comment

Protected Content