धावत्‍या एक्सप्रेसचे इंजिनापासून डबे झाले वेगळे; मोठा अपघात टळला

 चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव-पाचोरा दरम्यान वाघळी रेल्वे स्टेशन नजीक मुंबई-पाटलीपुत्र एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन हे वेगळे झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसून एक तासानंतर रेल्वे पाटलीपुत्राकडे रवाना झाली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) ही एक्सप्रेस मुंबईकडून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी मंगळवारी २६ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान,  गावाजवळ या धावत्या एक्सप्रेसचे इंजिन आणि डबे हे वेगवेगळे झाले. घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले, त्यानंतर पुन्हा डबे सोडून पुढे गेलेले इंजिन परत मागे आणण्यात येऊन डब्यांना जोडण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवनहानी व नुकसान झाले नाही. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा एक्सप्रेसचे वेगळे झालेले इंजिन पुन्हा जोडण्यात येऊन एक्सप्रेसला दुरुस्तीसाठी भुसावळ येथे नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. भुसावळ येथे या एक्सप्रेसची दुरुस्ती होवून रवाना झाली आहे.

 

Protected Content